भाजपाला सत्तेतुन घालवल्याशिवाय अच्छे दिन येणार नाही

भाजपाला सत्तेतुन घालवल्याशिवाय अच्छे दिन येणार नाही

खा. अशोक चव्हाण

मुंबई दि.४ राज्यातील भाजपाचे सरकार गेल्या तीन वर्षात सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असून, भाजप सरकारला चले जाव सांगण्याची वेळ आली आहे.असे सांगतानाच भाजपला सत्तेतून घालवल्याशिवाय लोकांचे अच्छे दिन येणार नाहीत, अशी टीका काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी आज महाड येथे झालेल्या जनआक्रोश मेळाव्यात केली.

निवडणुकीत खोटी आश्वासने देवून सत्तेत आलेल्या भाजपला जनता माफ करणार नाही. देशातील व्यापारीही त्रस्त झाला असून, एक ही भूल कमल का फूल असे आता व्यापारी म्हणू लागले असल्याचा टोला खा.चव्हाण यांनी यावेळी लगावला.राज्यात १२ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या असल्यातरी राज्य सरकारला लाज कशी वाटत नाही?
नोटाबंदी नंतर १५० लोकांचा मृत्यू झाला असल्याने या सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी खा.चव्हाण यांनी केली. राज्यात सगळ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. भाजपने महाराष्ट्र खड्ड्यात घातला आहे. अशी टीका करीत शेतक-यांच्या मालाला हमीभाव नाही, वीज नाही लोडशेडिंग सुरु आहे, नोक-या नाहीत बेरोजगारी प्रचंड वाढली असली तरी सरकारला जनतेच्या प्रश्नांशी देणेघेणे नाही. जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय हे सरकार लोकांचे प्रश्न सोडवणार नाही.आता या सरकारला पायउतार केल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

या जनआक्रोश मेळाव्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान सभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते शरद रणपिसे, आ. भाई जगताप, आ. हुस्नबानो खलिफे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी. आ. माणिकराव जगताप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, महाड च्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर. सी. घरत यांच्यासह कॉंग्रेसचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleफेरीवाला आंदोलनानंतर राज ठाकरे काय बोलणार ?
Next articleमुख्यमंत्र्यांच्या दिशेने धावणारा “मूकबधीर” तरुण पोलिसांच्या ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here