मुख्यमंत्र्यांच्या दिशेने धावणारा “मूकबधीर” तरुण पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्र्यांच्या दिशेने धावणारा “मूकबधीर” तरुण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई दि.४ राळेगणसिद्धी येथे सौरऊर्जा प्रकल्प भूमिपुजनाच्या कार्यक्रमात
सुरक्षा कवच भेदून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशांत कानडे या मूकबधीर तरूणाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. नोकरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी तो मंचाच्या दिशेने पळत जात होता.

कृषीपंपांना बारा तास सलग वीज पुरवण्यासाठी राळेगणसिद्धीत दोन हजार मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी मंचावर पोहोचल्यावर प्रशांत कानडे नावाचा बेरोजगार तरुण सुरक्षारक्षकांचे कडे भेदून मंचाच्या दिशेने पळाला, मात्र सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला रोखले आणि त्याची रवानगी स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली.

प्रशांत कानडे असे हा मूळचा नगर तालुक्यातील मेहेकरीचा निवासी आहे. प्रशांत हा मूकबधीर असून तो नोकरीसाठी प्रयत्न करत होता. बँकेत शिपाई पदावर नोकरी मिळावी यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र नोकरी मिळत नसल्याने तो हताश होता. नोकरीसाठी त्याने मुख्यमंत्री कार्यालयाला १० महिन्यांपूर्वी निवेदनही दिले होते.

Previous articleभाजपाला सत्तेतुन घालवल्याशिवाय अच्छे दिन येणार नाही
Next articleशेततळ्यासाठी निधी काँग्रेस आघाडी सरकारचा, जाहिरातबाजी युती सरकारची!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here