पुढची दिवाळी राम मंदिरात साजरी करणार
योगी आदित्यनाथ
मुंबई दि. ४ देशातील सर्वात चर्चेत असणा-या आयोध्येतील राम मंदिर उभारणी संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मोठा खुलासा करत पुढील दिवाळी राम मंदिरामध्ये साजरी करू असे वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईच्या दौ-यावर आहेत.
भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नुकत्याच व्यक्त केलेल्या वक्तव्याचे समर्थन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की , दिवाळी सणाचा जन्मच आयोध्या मध्ये झाला होता. रामाने १४ वर्षाचा वनवास आणि लंकेवर विजय मिळवल्यानंतर राम परत आयोध्ये मध्ये आल्यावर त्यांच्या स्वागतासाठी आयोध्येतील जनतेने दिवाळी साजरी केली होती. असे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा लवकरच आणि योग्य असाच असेल अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आम्ही देवदेवतांचा सन्मानच करतो,परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यावर जास्त बोलणे उचित नसल्याचे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. न्यायालयात या प्रकरणाची जलद गतीने कार्यवाही सुरू असल्याने लवकरच निकाल अपेक्षित असून , तो आमच्या बाजूने लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुढील दिवाळी राम मंदिरात साजरी करू असे वक्तव्य केले होते त्या विषयी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, पुढील दिवाळी राम मंदिरातच साजरी करू, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळची दिवाळी आयोध्येतील सरयू घाटावर साजरी केली होती.