मुंबई नगरी टीम
औरंगाबाद । शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील काही आमदार नाराज असून त्यांना पश्चाताप झाल्याने शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केला असतानाच, मी नाराज नसून सुषमा अंधारे यांनी केलेल्या दाव्यात कोणतही तत्थ्य नाही, असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले आहे.
शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे नाराज असून,ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जळगावात केला आहे.यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले आहे.सुषमा अंधारे मला भावाप्रमाणे समजतात.कुणीतरी माझी काळजी करणारा आहे.मात्र माझी कसलीही नाराजी नाही असे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.माझ्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील.त्यामुळे सुषमा अंधारे यांनी दावा केलेल्या दाव्यात कोणतही तत्थ्य नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.