२०१९ मध्ये शरद पवार देशाचे पंतप्रधान होवू शकतात

२०१९ मध्ये शरद पवार देशाचे पंतप्रधान होवू शकतात

प्रफुल्ल पटेल यांचे भाकित

कर्जत दि. ६ देशातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता येत्या दोन वर्षात राजकारणात मोठी उलथापालथ होवू शकते असे स्पष्ट करतानाच या परिस्थितीत शरद पवार हे पंतप्रधान होऊ असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय चिंतन बैठकीस आज सुरुवात झाली.या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना प्रफुल्ल पटेल यांनी वरील भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर चुकीच्या पद्धतीने टीका करून पक्षाची बदनामी केली जात असताना आपण समजून, विचार करून पुढचे पाऊल टाकण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याला योग्य दिशेने नेण्यासंबंधीची भूमिका आपल्याला बसून ठरवायला हवी अशी भूमिका त्यांनी मांडली.

देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा दबदबा असल्यामुळे पुढच्या राजकारणातही त्यांचा मोठा वाटा असेल असे संकेत पटेल यांनी दिले. प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या ९९ च्या स्थापनेपासून ते आतापर्यंत सुरु असलेली वाटचाल तसेच अध्यक्ष शरद पवार यांच्या धोरणांबाबत माहिती दिली. त्यांनी पक्षातील वाटचाली, इतर पक्षांशी करावी लागणारी तडजोड याबाबतही मार्गदर्शन केले. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याबाबतची भूमिकाही ठरवण्याबाबत त्यांनी भाष्य केले.

Previous articleभाजप सरकार बहिरे आणि आंधळे
Next articleअखेर गिरिश महाजनांची माफी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here