अखेर गिरिश महाजनांची माफी
मुंबई दि. ६ दारुचे ६५ ब्रॅण्ड असल्याने ज्याचा खप नाही. म्हणून गमतीने या ब्रॅण्डना महिलांची नाव देऊन बघा असे मी वक्तव्य केले होते. आणि हे विनोदाचा भाग म्हणून बोललो. यामध्ये कुठल्याही महिलेचा अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माफी मागितली आहे.
नंदुरबारमध्ये सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमावेळी बोलताना, साखर कारखान्याने निर्मित केलेल्या दारुच्या ब्रॅण्डला महिलांची नावे दिल्यास अधिक खप होईल, असे वादग्रस्त विधान गिरीश महाजन यांनी केले होते.