१५ डिंसेंबर पूर्वी खड्डेमुक्त रस्ते ; देखरेखीसाठी “वार रूम”
मुंबई दि.६ राज्यातील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी येत्या १५ डिंसेंबरची मुदत दिली असून,राज्यातील खड्डे बुजवण्याच्या मोहिमेसाठी ९७ हजार किलोमीटर मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्रालयातच “वॉर रुम” सुरू केल्याने मुदत पाळण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकले गेल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादी काॅग्रेसने ” सेल्फी विथ खड्डा” ही मोहिम राबविल्यानंतर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे. आता खड्डे बुजविण्याचा कामाला गती मिळून ,रोज किती किमी मार्गावरचे खड्डे बुजवले गेले, याचा आढावा घेतला जात आहे. खड्डे बुजवण्यासाठी मंत्रालयात सुरू करण्यात आलेल्या “वॉर रुमच्या” माध्यमातून जिल्हानिहाय कामांवर लक्ष ठेवले जाणार आहे.दररोज किती किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले हे गूगलच्या सहाय्याने समजणार आहे.