आरक्षण बदलल्यास सरकार बदलेल
केंद्रिय राज्यमंत्री आठवले यांचा इशारा
भंडारा दि.७ इंदु मिल मधिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही दिली आहे अशी आठवण सांगत,त्यामुळे आरक्षण बलणार नाही. विनाकारण अधूनमधून उठणाऱ्या अफवेवर विश्वास ठेवू नका, परंतु “ज्या दिवशी आरक्षण बदलेल त्यादिवशी सरकार बदलेल” असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.
आंबेडकरी विचार जागृती समितीच्यावतीने भंडारा येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंबेडकरी विचार संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर आठवले बोलत होते.”आज आले आमचे भरून मन” ‘भंडाऱ्यात होत आहे आंबेडकरी संमेलन’ असे म्हणत भाषणाला सुरुवात करीत आठवले म्हणाले, या संमेलनात पक्षभेद विसरून सर्वजण एकत्र आल्याचा आनंद झाला आहे. मी आंबेडकरी कार्यकर्ता असून एका कार्यकर्त्यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आयोजकांचा आभारी आहे. गावागावांत जाऊन प्रचार करा, असेही त्यांनी सांगितले.