झेराॅक्स मशिन नादुरूस्त झाल्यास अधिकारी, कर्मचा-यांच्या पगारातून खर्च वसूल करणार

झेराॅक्स मशिन नादुरूस्त झाल्यास अधिकारी, कर्मचा-यांच्या पगारातून खर्च वसूल करणार

मुंबई दि.७ मंत्री, राज्यमंत्री यांच्या कार्यालयातील झेरॉक्स मशिन अनेक कारणांनी नादुरूस्त होण्याचे प्रकार घडत असल्याचे उघड झाल्याने, यांची व्यवस्थित देखभाल न केल्यास त्याचा दुरुस्तीचा खर्च आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल केला जाणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. मंत्री, राज्यमंत्री कार्यालयातील झेरॉक्स मशिन या अत्याधुनिक आणि महागड्या आहेत. या मशिन वारंवार बंद पडत असल्याबाबतच्या तक्रारी मंत्र्यांच्या कार्यालयांकडून सातत्याने येत आहेत.त्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या झेरॉक्स मशिन्स वापरताना आता कर्मचाऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.

झेरॉक्स मशिनचे इतर कप्पे उघडे ठेवल्याने त्यामध्ये उंदिर जावून वायर कुरतडल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडल्याने अनेक झेराॅक्स मशिन नादुरूस्त आहेत. मशिन जवळ खाद्यपदार्थ ठेवल्याने झेरॉक्स मशिनच्या आसपास उंदीर, झुरळांचा वावर वाढतो. ट्रे उघडे ठेवू नये, झेरॉक्स प्रती काढल्यावर त्याच ठिकाणी स्टेपल करु नये, अशी काळजी घेण्याबाबतचे आदेश या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.

Previous articleआरक्षण बदलल्यास सरकार बदलेल
Next articleविशेष आर्थिक क्षेत्रामध्ये उभारण्यात येणा-या उद्योगांना मुद्रांक व नोंदणी शुल्क माफ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here