उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई दि.७ शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाल्याचे समजते. दहा दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या ” सिल्वर ओक” या निवासस्थानी भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते. या दोन बड्या नेत्यांमध्ये राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा झाली.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटी नंतर , या दोन बड्या नेत्यांच्या भेटीची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे समोर आले आहे. खुद्द शरद पवार यांनीच हा वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज्यातील सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यातील सत्तेत राहायच की नाही याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरु झाली आहे. मात्र, शरद पवार यांच्या भेटीबाबत शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होवू शकली नाही.

Previous articleविशेष आर्थिक क्षेत्रामध्ये उभारण्यात येणा-या उद्योगांना मुद्रांक व नोंदणी शुल्क माफ
Next articleहोय….उध्दव ठाकरे यांनी माझी भेट घेतली !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here