ठाणे जिल्हा परिषदेसाठी १३ डिसेंबरला मतदान

ठाणे जिल्हा परिषदेसाठी १३ डिसेंबरला मतदान

मुंबई, दि.७ ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पाच पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच इतर विविध ठिकाणच्या आठ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता १३ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याची घोषण राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.

सहारिया यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा परिषदेच्या ५३; तर त्यांतर्गतच्या शहापूर (जागा २८), मुरबाड (१६), कल्याण (१२), भिवंडी (४२) आणि अंबरनाथ (८) या पाच पंचायत समित्यांच्या एकूण १०६ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मतदान केंद्रांची यादी व मतदार केंद्रनिहाय मतदार यादी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. नामनिर्देशनपत्रे २३ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत स्वीकारली जातील. नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संकेतस्थळाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

वाशीम जिल्हा परिषदेच्या पांगरी नवघरे (ता. मालेगांव) निवडणूक विभागाच्या रिक्त पदासाठीदेखील १३ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. चाणजे (ता. उरण, जि. रायगड), माटणे (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग), पानेवाडी (ता. नांदगाव, जि. नाशिक), कोठली खु. (ता. नंदुरबार, जि. नंदुरबार), किल्लारी (ता. औसा, जि. लातूर), मलकापूर (ता. अकोला, जि. अकोला) आणि मार्डी (ता. मारेगाव, जि. यवतमाळ) या निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील १३ डिसेंबर रोजी मतदान होईल, असेही सहारिया यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रमाचा तपशील:
• नामनिर्देशनपत्रे सादर करणे- २३ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर
• नामनिर्देशनपत्रांची छाननी-२९ नोव्हेंबर
• अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- ४ डिसेंबर
• अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- ७ डिसेंबर

• मतदानाचा दिनांक- १३ डिसेंबर
• मतमोजणीचा दिनांक- १४ डिसेंबर

Previous articleनोटाबंदीमुळे कृषी, असंघटीत क्षेत्राची वाताहत झाली
Next article१५ डिसेंबर पर्यत रस्ते खड्डे मुक्त करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here