मुंबईतील प्रभाग क्रमांक २१ व ६२ च्या पोटनिवडणुकीसाठी १३ डिसेंबरला मतदान

मुंबईतील प्रभाग क्रमांक २१ व ६२ च्या
पोटनिवडणुकीसाठी १३ डिसेंबरला मतदान

मुंबई, दि. ७ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ आणि ६२ च्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी १३ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.

सहारिया यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २० ते २७ नोव्हेंबर या कालावधीत स्वीकारण्यात येतील. त्यांची छाननी २८ नोव्हेंबर रोजी होईल. ३० नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. निवडणूक चिन्हांचे वाटप २ डिसेंबर रोजी होईल. मतदान १३ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी १४ डिसेंबर रोजी होईल.

Previous article१७ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी १० आणि १३ डिसेंबरला मतदान
Next articleराष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरावर उध्दव ठाकरे यांचे टीकास्त्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here