मणीपूर जळत असताना कुस्तीगीर महिला टाहो फोडत असताना उज्ज्वल निकम कुठे होते ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपावाले ॲड उज्ज्वल निकम यांना कायदा मंत्री करायला निघालेत.मात्र निकम यांनी कधीच कायद्याच्या प्रक्रियेबाबत आवाज उठवलेला नाही.ते विशेष सरकारी वकील म्हणून ठराविकच पद्धतीच्या केसेस लढतात.कायद्याचे भान असणे ही वेगळी गोष्ट आहे.देशात कायदा धाब्यावर बसवला जात असताना,मणीपूर, कुस्तीगीर महिला टाहो फोडत असताना निकम कुठे होते ? असा सवाल ॲड असीम सरोदे यांनी विचारला आहे. निर्भय बनोच्या वतीने सरोदे बोलत होते.

उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणारे ॲड उज्ज्वल निकम यांचा निष्णांत वकील म्हणून उल्लेख केला जातो.मात्र ॲड निकम यांना कायद्याबाबतचा फार वकुब आहे असे त्यांनी कधी दाखवलेले नाही, असेही ॲड सरोदे म्हणाले. यावेळी त्यांनी निकम यांना जाहिरपणे काही प्रश्न विचारले आहेत.कसाब सारखे अतिरेकी कसे तयार होतात,त्यांची प्रवृत्ती याचा अभ्यास करून त्याविषयी मुळापर्यंत पुढे जाता येईल. कदाचित यांना रोखणंही शक्य होईल, असा विचार सनदी पोलीस अधिकारी सदानंद दाते यांनी मांडला होता. या अभ्यासासाठी यंत्रंणा तयार करण्याची तयारी राज्य सरकारने केली.पण ॲड निकम यांनी अडथळा उभा करून हे होवू दिले नाही, असा आरोप ॲड सरोदे यांनी केला.

राज्यात पक्षांतर करून सरकार पाडण्यात आले.राज्यपालांनी संसदीय प्रक्रिया डावलली. हे कोणत्या कायदेशीरबाबीत बसते ? यावर ॲड निकम बोललेत का काही ? इलेक्ट्रॉल बॉन्डचा मोठा घोटाळा सर्वोच्च न्यायालयाने बाहेर काढला, कायद्याच्या बाजूने ॲड. निकम यावर काही बोललेत का ? ३७० कलम हटवल्याचा दावा अमित शहा करत आहे. खरंच सविधानातून ३७० कलम हटवले गेले की त्यातले ब पोटकलम खिळखळे केले, याबाबत ॲड निकम काही बोलतील का असा सवालही सरोदे यांनी केला. मणिपूर जळत होते, महिलांची नग्न धींड काढली गेली. कुस्तीगीर महिला खेळाडूंवर भाजप खासदार लैंगिक शोषण करत होते. त्या ब्रिजभूषणला भाजपने संरक्षण दिले. प्रज्वल रेवण्णांने २२०० मुलींचे शोषण करून व्हिडिओ तयार केले. पंतप्रधान म्हणतात रेवण्णाला मत हे मला मत या महिलांच्या प्रश्नावर कायद्याच्या भाषेत ॲड निकम काही बोललेत का ? महिलांवरील शोषणाबाबत त्यांची काही भूमिका आहे ? असे प्रश्न ॲड सरोदे यांनी विचारले आहेत. ईडी, सीबीआय, अशा यंत्रणा राजकीय हेतूने वापरल्या जात आहेत,कधीच यावर ॲड निकम बोलले नाहीत.कारण कायदा प्रक्रिया, त्याचे भान, सामाजिक आशय याबाबत ॲड निकम यांना गती नाही, असेही ॲड सरोदे म्हणाले.

वर्षा गायकवाड यांना सकल मराठा समाजाचा पाठिंबा

उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील सकल मराठा समाजाने इंडिया आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. कुर्ला पश्चिम श्री कच्छीविसा सभागृहात सकल मराठा समाजाने जाहीर सभा आयोजित केली होती.मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय संसदेत प्रभावीपणे मांडून मराठा समाजाला न्याय मिळवून देवू असे आश्वासन यावेळी गायकवाड यांनी दिले.

Previous articleझूठ बोलने वाला आदमी देश तो क्या दुनिया में कोई नहीं हुआ होगा ! आंबेडकरांचा मोदींवर निशाणा
Next articleमहाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील; शिंदे गटाच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ