नोटाबंदीमुळे काळा पैसा बाळगणारे नाराज

नोटाबंदीमुळे काळा पैसा बाळगणारे नाराज

केंद्रियमंत्री नितीन गडकरी

मुंबई दि.८ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर डिजिटल व्यवहारामध्ये ५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वसामान्य जनता आता कॅशलेस व्यवहार करताना दिसत आहेत. असा दावा करतानाच नोटाबंदीमुळे काळा पैसा बाळगणारे नाराज असल्याचा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षाला लगावला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या घोषणेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे.या पार्श्वभूमीवर केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेवून नोटाबंदीचे महत्व समजावून सांगितले.
नोटाबंदीमुळे काळा पैसा बाळगणारे नाराज आहेत. नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात पैसा बँकेत जमा झाला असून, तो काळा पैसा असल्याच्या संशयातून सध्या पैशाची चौकशी सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

नोटाबंदीमुळे काही लोकांना त्रास झाला असल्याचे मान्य करून, अर्थव्यवस्था मजबूत झाली असल्याचा दावा गडकरी यांनी केला. नोटाबंदीनंतर १.३८ लोकांनी ५ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. तसेच ‘नोटाबंदीनंतर काश्मीरमधील दगडफेक कमी झाली, असेही त्यांनी सांगितलं. नोटाबंदीमुळे संपूर्ण देश हसला पण काॅग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मात्र रडत आहेत आहेत. सत्ता गेल्याने त्यांची ही अस्वस्थ आहे, असे म्हणत गडकरी यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला.

Previous articleराष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरावर उध्दव ठाकरे यांचे टीकास्त्र
Next articleनोटबंदी वर्षपूर्तीच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here