देवेंद्रजी, तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा

मुंबई नगरी टीम

मुंबई । देवेंद्रजी काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होतात गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील.आज गरिबा घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली अन् तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले, दहा तासात जामीन करून दिला तो पण रविवार असताना अशा शब्दात नाराजी व्यक्त करीत देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत वाहन चालवत दोन दुचाकीस्वारांना धडक दिली.त्यात दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.देवेंद्रजी,काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होतात की गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील. आज गरिबा घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली आणि तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले,दहा तासात जामीन करून दिला, तो पण रविवार असताना अशी नाराजी व्यक्त करीत,देवेंद्रजी आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा ? असा सवाल त्यांनी विचारला.माजी नगरसवेक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता.त्यानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करीत विरोधकांनी गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा मागितला होता.विरोधकांच्या या मागणीला प्रत्युत्तर देताना गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील असे फडणवीस म्हणाले होते.

देशमुख यांनी केलेल्या मागणीवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांचा समाचार घेतला.पुण्याच्या घटनेवर राहुल गांधी यांनी ज्या प्रमाणे वक्तव्य केले आहे.त्यावरून राजकारण करण्याचा मोठा प्रयत्न होत आहे. या घटनेनंतर पोलीसांनी लगेच कारवाई केली आहे. प्रत्येक घटनेत राजकारण करणे सुरू आहे असे सांगून त्यांनी याचा निषेध केला आहे.ज्यांच्यावर शंभर कोटी वसुलीचा आरोप आहे, ज्या व्यक्तीवर न्यायालयाने गुन्हा दाखल केला आहे त्यावर काय बोलणार असे फडणवीस म्हणाले.तर पुणे अपघात प्रकरणी आरोपीला फायदा पोहचवण्यासाठी पुणे पोलिसांनी तपासात मुद्दाम अनेक घोळ केले आहेत.पहिला गुन्हा दाखल करताना अनेक त्रुटी ठेवल्या होत्या यावरून पोलिसांच्या कृतीवर शंका उपस्थित होत आहे.घाटकोपर प्रकरणी एसआयटी नेमली तशी पुण्याच्या प्रकरणात देखील न्यायिक चौकशी करावी अशी मागणी करत पुणे पोलिसांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.पहिला गुन्हा दाखल करताना योग्य कलमे का लावण्यात आली नव्हती ? ही दिशाभूल का केली जात आहे ? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

Previous articleलोकसभा निवडणुका संपल्या आता सरकारने दुष्काळाकडे लक्ष द्यावे !
Next articleराज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष