मुंबई नगरी टीम
मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत काल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेशाची आरती केली.यावरून विरोधकांनी भाजपावर भाजपाला लक्ष्य केले असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी झालेल्या इफ्तार पार्टीचे फोटो शेअर करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला गेले तर इतका गहजब का ? असा विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल दिल्लीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जावून गणपतीची आरती केली.या भेटीनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, यावरून त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाला लक्ष्य केले आहे. शिवसेनाचे ( उबाठा ) खासदार संजय राऊत यांनी ट्विट करीत संविधान के घर को आग लगी,घरके चिरागसे,ईव्हिएम को क्लीन चीट,महाराष्ट्र में चलरही संविधान विरोधी सरकार के सुनवाई पर ३ सालसे तारीख पे तारीख प. बंगाल बलात्कर मामले मे suemoto हस्तक्षेप लेकीन,महाराष्ट्र रेप कांड का जिकर नहीं. दिल्ली मुख्यमंत्री केजरीवाल के bail पर तारीख पे तारीख.ये सब क्युं हो रहा है? क्रॉनॉलॉजी समज लिजीये,भारत माता की जय अशा शब्दात या भेटीचा समाचार घेतला.आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचे काही फोटो शेअर करीत विरोधकांना जशास तसे उत्तर दिले आहे.
गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे.आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. काल तर गौरी-गणपतीतील महालक्ष्मीपूजन सुद्धा होते.देशाचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूडजी यांच्याकडे काल पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात.पण अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले. फरक फक्त इतकाच आहे की,आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का ? हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी ? प्रश्न गहन आहे. हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा,गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा अपमान नाही का ? असा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.