नोटबंदी वर्षपूर्तीच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन

नोटबंदी वर्षपूर्तीच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन

मुंबई दि. ८ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी राज्यातील विविध भागात नोटबंदीच्या निषेधार्थ आंदोलन केले.नोटबंदीच्या वर्षपूर्तीच्या निषेधार्थ काँग्रेसने आज ‘काळा दिवस’पाळला आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्त्वा खाली आझाद मैदानात सामुहिक मुंडन करून नोटबंदीचा निषेध करण्‍यात आला.औरंगाबाद मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसने नोटबंदीच्या निषेधार्थ सामूहिक मुंडण आंदोलन करीत मोदी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.

नोटबंदीच्या निषेधार्थ पंढरपुरात वर्षश्राद्ध व पिंडदान आंदोलन करण्यात आले. नोटबंदीच्या काळात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना काँग्रेसने श्रद्धांजली अर्पण केली.काँग्रेस तसेच भारिप बहुजन संघाने नोटबंदीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केले.यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
जळगाव मध्येही नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालून निषेध करण्यात आला.नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेस व राष्ट्रवादीने शहरात ठिकठिकाणी आंदोलन केले.

पुण्यात नोटबंदीच्याविरोधात राष्ट्रवादीने मोर्चा काढला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्र येऊन सरकारचा निषेध केला. लोकमान्य टिळक पुतळा, मंडईपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. पुण्यात सामाजिक संस्थांनीही आंदोलन केलं. विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधासाठी मानवी साखळी तयार केली आणि मोदी सरकारचा निषेध केला.

राष्ट्रवादीतर्फे मुंबईत आझाद मैदानात नोटबंदीचं वर्षश्राद्ध घालण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन राष्ट्रवादीने हा मोर्चा काढला आणि आझाद मैदानात श्राद्ध घातले.

सोलापुर मध्येही काँग्रेसने नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काळा दिवस साजरा आंदोलन केलं. तर भाजपने भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून नोटाबंदीच्या समर्थनार्थ उत्सव साजरा केला. काँग्रेसकडून ८ नोव्हेंबर काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे.

Previous articleनोटाबंदीमुळे काळा पैसा बाळगणारे नाराज
Next articleचंद्रकांत पाटलांना उपसमितीतून हटवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here