सातपुडा सरकारी बंगला अजून का सोडला नाही ! धनंजय मुंडेंनी सांगितले कारण

मुंबई नगरी टीम

मुंबई । धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद गेल्यांतरही त्यांनी अद्याप सातपुडा हा सरकारी बंगला सोडलेला नाही.त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले असतानाच आपण सातपुडा बंगला का सोडला नाही याचे स्पष्टीकरण दिले आहे.मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्या योग्य नसून, त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे.भाड्याने घर मिळणे सध्या कठीण आहे, माझा शोध ही सुरु आहे.माझ्या सदनिकेचे काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून, तशी शासनाकडे विनंती केली आहे असल्याचे धनंजय मुंडे यांनी संगितले आहे.

धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद गेल्यांतरही त्यांनी अजून सातपुडा या शासकीय बंगल्याचा ताबा  सोडलेला नाही. यामुळे मुंडे यांना आतापर्यंत 42 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. हा दंड माफ करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर असलेल्या घराचा उल्लेख केलेला आहे. मात्र मुंबईत घर नसल्याने बंगला खाली केला नसल्याचे मुंडे यांनी यापुर्वी सांगितले होते. त्यांनतर त्यांचे गिरगाव येथे प्रशस्थ सदनिका असल्याचे पुढे आल्याने त्यांच्यावर चौफेर टीकास्त्र सुरू होताच मुंडे यांनी या प्रकरणी खुलासा केला आहे.मुंबईतील सातपुडा हे शासकीय निवासस्थान मी रिक्त केले नसल्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत.मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्या योग्य नसून, त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणे गरजेचे आहे. मात्र या परिसरात तातडीने  भाड्याने घर मिळणे सध्या कठीण आहे, माझा शोध ही सुरु आहे.माझ्या सदनिकेचे काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून,तशी शासनाकडे विनंती केली आहे असे मुंडे यांनी सांगितले आहे.

Previous articleगणेशोत्सव मंडळांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘स्वदेशी’ची जनजागृती करावी
Next articleअजितदादा अ‍ॅक्शन मोडवर; मुंबई-गोवा महामार्गाबाबत दिले धडक कार्यवाहीचे आदेश