काँग्रेसच्या काळ्या भ्रष्टाचाराचे काळे दिवस नोटबंदीने संपविले
रामदास आठवले
मुंबई दि.८ नोटबंदी मुळे देशातील काळा पैसा बाहेर येवून, भ्रष्टाचारावर आळा बसला आहे . काँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळे देशातील काळे दिवस नोटबंदीमुळे दूर झाले असा घणाघात काळा दिन पाळणाऱ्या काँग्रेसवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले केला आहे.चैत्यभूमी येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या अभिनंदनासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ढोल वाजवून नोटबंदीचे यश साजरे करण्यात आले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळा पैसा रोखण्यासाठी देशात दर दहा वर्षांनी चलन बदलण्याचा उपदेश केला होता.त्यानुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काळा पैसा रोखण्यासाठी गतवर्षी चलन बदलण्याचा निर्णय घेत एक हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा बंद केल्या. त्यामुळे काळ्या पैश्यावाल्यांचे ;भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले आणि काळा पैसा बाहेर आला.भ्रष्टाचार मोठय प्रमाणात रोखता आला . नोटबंदी वेळी देशभरातील सामान्य जनतेने केंद्र सरकारला जे सहकार्य केले .ती मोठी देशसेवा होती असे आठवले यांनी देशवासीयांचे आभार मानले.
नोटबंदी चा वर्धापन दिन काँग्रेस ने काळा दिन म्हणून पाळत असले तरी त्यांची ती भूमिका चूक आहे . काँग्रेसच्या सत्ता काळात अनेक भ्रष्टाचार झाले . गरिबी हटविण्याच्या केवळ पोकळ घोषणा झाल्या प्रत्यक्ष काळा पेश्यावाल्यांचे काळे धन वाढवून काँग्रेसने गरिबांच्या पुढ्यात काळे दिवस वाढले होते. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी नोटबंदी करून काळ्या पेश्याला लगाम घातला असे आठवले म्हणाले.