शिवसेना गुजरातमध्ये ४० जागा लढवणार
मुंबई दि.९ गुजरात विधानसभा निवडणूकांच्या आखाड्यात शिवसेना उतरणार असुन, किमान ४० जागा लढविणार आहे. शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई याबाबत पत्रकार परिषद घेवून भूमिका मांडणार आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नसल्याचे यापूर्वी स्पष्ट केले होते पण आता शिवसेना निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्यामुळे शिवसेना आणि भाजप मधिल दरी वाढणार आहे. शिवसेनेच्या गुजरात मध्ये विधानसभा लढविण्याच्या निर्णयामुळे गुजरातमध्ये भाजपची डोकेदुखी आणखी वाढू शकते. गुजरात विधानसभेच्या रिंगणात ४० पेक्षा जास्त जागांवर शिवसेना आपले उमेदवार उभे करणार आहे. बिहार मध्ये शिवसेनेमुळे भाजपच्या मतांमध्ये मोठी घट झाली होती. गुजरातमध्येही शिवसेनेमुळे हिंदुत्वावादी मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम भाजपलाच्या मतांवर होवू शकतो.
गुजरातमध्ये भाजपला हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी आव्हान दिले असतानाच आता शिवसेनेने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला गुजरातची निवडणूक जड जाण्याची चिन्हे आहेत.