मुंबईतील आपत्ती निवारण्यासाठी विशेष उपसमिती गठीत
मुंबई दि. ९ मुंबई शहरामध्ये भविष्यात आपत्ती उदभवल्यास किंवा संभाव्य आपत्ती त्यांचे परिणाम त्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि भविष्यात करावयाची कार्यवाही यासाठी अपर मुख्य सचिव ( गृह) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष उपसमिती गठीत करण्यात आली आहे.
मुंबई मध्ये महत्वाची खाजगी आणि सरकारी कार्यालये आहेत. दक्षिण मुंबईमध्ये विविध महत्वाची कार्यालये असल्याने या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मुंबईत एखादी आपत्ती उदभवल्यास त्याबाबत सर्व यंत्रणा मध्ये समन्वय करण्यासाठी अपर मुख्य सचिव ( गृह) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष उपसमिती गठीत करण्यात आली आहे. १५ सदस्य असलेली विशेष उपसमिती मुंबई मध्ये एखादी आपत्ती उदभवल्यास, संभाव्य आपत्ती त्यांचे परिणाम, त्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि भविष्यात करावयाची कार्यवाही याबाबत राज्य कार्यकारी समितीस सल्ला देणे व मदत करण्याचे काम ही विशेष उपसमिती करणार आहे.