गुजरात निवडणूकीत सत्ता आणि पैशाचा वापर

गुजरात निवडणूकीत सत्ता आणि पैशाचा वापर
शरद पवार यांचा आरोप

मुंबई दि. ९ गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल काय येतील यावर आत्ताच भाष्य करणे योग्य नाही मात्र त्या ठिकाणी सत्ता व पैशाचा प्रचंड वापर होत असल्याचा आरोप राष्ट्रावादी कांग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला.पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा आलेख आता पुर्वीसारखा राहिलेला नाही.कांग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांची सत्ताधारी पक्षाकडून समाज माध्यमांवर कुचेष्टा करण्यात येत होती.पण आता लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले.

गुजरातमध्ये राष्ट्रवादीचे दोनच आमदार असून, पक्षाकडून यावेळी अधिकच्या जागा लढविण्यात येणार आहे. युती संदर्भात काँग्रेससोबत प्राथमिक चर्चा केली आहे मात्र भाजप सोबत राष्ट्रवादी गुजरात किंवा अन्य राज्यात कदापी जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.केंद्र व राज्यातील भाजप सरकारला पवार यांनी यावेळी लक्ष्य केले. मेट्रोला आपला विरोध नाही, मात्र पर्यावरणाचा विचार व्हायलाच हवा. समृद्धि महामार्गासाठी जमिनी घेण्याची पध्दती अमानूष असून, शेतक-यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी दक्ष राहाणा-या एका शेतक-याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचे प्रकरण आपल्याकडे आले असल्याचे त्यांनी सांगितले. या अमानूष पणाबद्दल राज्यातील सर्व शेतक-यांना सोबत घेऊन वेळ पडल्यास राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष समविचारी पक्षांसोबत रस्त्यावर उतरेल असा इशाराही पवार यांनी दिला .नोटाबंदीचे परिणाम कामगार कपात होण्यात होत आहेत. आधी महामंदी होती त्यामध्ये नोटाबंदी आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशातील काळा पैसा आणून देशातील प्रत्येकाच्या खात्यावर जमा करणार होते. पण आता इडी व आयकर हे विभाग लोकांना त्रास देत आहेत त्याचीही आम्ही दखल घेतली आहे असेही पवार म्हणाले. शेतक-ायांबाबत हे सरकार गंभीर नाही. डॉ. स्वामीनाथन शिफारसी लागू करा अशी मागणी करणारेच आता सत्तेवर आल्यावर त्या लागू करू श कत नाही अशी कबूली देत आहेत याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

Previous articleसोलापूर विद्यापीठ कुलगुरु निवडीसाठी समिती गठीत
Next articleसेल्फी विथ खड्डे’ च्या मोहिमेत धनंजय मुंडे यांचीही उडी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here