मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून तरूण शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून तरूण शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई दि. १० मंत्रालयाच्या अॅनेक्स इमारती मधिल सातव्या मजल्यावर आज एक तरूण शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री अथवा , कृषीमंत्री आल्या शिवाय मी खाली उतरणार नाही असे हा तरूण बोलत आहे. ज्ञानेश्र्वर साळवे असे या तरूणाचे नाव असून, तो तुळजापूर जि. उस्मानाबादचा शेतकरी आहे.सोयाबीन, कापसाचा भाव पडल्याने त्याला शेती मध्ये मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

सरकारच्यावतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे हे या तरूण शेतक-याची समजूत काढत असून, हा तरूण शेतकरी अजूनही मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर आहे.

दरम्यान या तरूण शेतक-याचे प्राण वाचविण्यासाठी मंत्रालय परिसरात पोलीस अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहे.या तरूणाने हातात मोठी काच घेतली असून , मी येथूच आत्महत्या करेल असा इशारा दिला आहे.

Previous articleसेल्फी विथ खड्डे’ च्या मोहिमेत धनंजय मुंडे यांचीही उडी!
Next articleअखेर मंत्रालयातील ड्रामा संपला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here