होय..येत्या शनिवारी आणीबाणीचा प्रयोग रचला जाणार !

राज ठाकरे

मुंबई दि.११ येत्या शनिवारी म्हणजेच १८ तारखेला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा होणार आहे.या सभेच्या वेळी समाज माध्यमांचा वापर कमी व्हावा व भाषण पहाता येवू नये म्हणून राज्य शासन पुरस्कृत अघोषित लोडशेडींग होवू शकते.त्यामुळे काही तासांकरीता आणीबाणीचा प्रयोग रचला जाणार असल्याचा घणाघात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक वाॅल वरून केला आहे.

येत्या शनिवारी १८ तारखेला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात सभा होणार आहे.या सभेच्या दरम्यान राज्य शासन पुरस्कृत लोडशेडींग होण्याची शक्यता व्यक्त करून, जिथे लोडशेडींग लादता येणार नाही तिथे काळजीपूर्वक केबल कनेक्शन बंद केली जातील. ही कोणत्या आणीबाणीची तयारी आहे का ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर “हो असंच आहे.शनिवारी संध्याकाळी काही तासांकरीता आणीबाणीचा प्रयोग रचला जाणार आहे. असे या पोस्टमधून स्पष्ट करण्यात आले आहे.

तरी या सभेवेळी आपणाकडे जनरेटर्स, इन्व्हटर्स, मेणबत्या तयार ठेवा असे आव्हान करण्यात आले आहे. अडाणी सरकारला याची अजून कल्पना नाहीये की, भाषण हे नंतर देखील युट्यूब, व्हाॅटसअपवर, फेसबुकवर बघता येते त्यामुळे आपण सतर्क रहावे..बाकी आपण सर्व सुज्ञ आहातच…असेही या पोस्ट मध्ये म्हटले आहे.मनसेच्यावतीने जनहितार्थ हि माहिती फेसबुक पेज वरून प्रसिध्द करण्यात आली आहे.

रंगशारदा मध्ये झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाॅर्ड ऑफिसर, स्टेशन मास्तर आणि पोलीस अधिका-यांना फेरीवाला प्रश्नी दिलेल्या इशा-यानंतर येत्या १८ नोव्हेंबरला त्यांची ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून ते फेरीवाल्यांसह विविध प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.मनसेच्या भूमिकेमुळे सध्या फेरीवाल्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एलफिन्स्टन रेल्वे पादचारी पुलावरील दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात बसणा-या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या भूमिकेचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे. तर ; मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांनी मोकळा श्वास घेतला आहे.

मनसेच्या अनधिकृत फेरीवाला हटाव आंदोलनाची सुरूवात ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून झाली होती. त्यामुळे मनसेची जाहीर सभा ठाण्यामध्येच होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चगेट येथे झालेल्या मोर्चात फेरीवाल्यांना हटवण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. पण त्यानंतरही फेरीवाल्यांनी पदपथ अडविल्याने मनसैनिकांनी रस्त्यावर उतरुन फेरीवाल्यांना हटवले होते. ठाणे महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रथमच राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेविषयी कमालीची उत्सुक्ता आहे.

Previous articleआ. पाटील यांनी काढली बादशहा शाहरूख खानची खरडपट्टी !
Next articleतर पक्षाला ज्ञानेश्वरचा साळवेचा अभिमान आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here