सुनिल तटकरेंनी साळवेला “त्या” प्रकारापासून रोखण्याचा केला होता प्रयत्न !

सुनिल तटकरेंनी साळवेला “त्या” प्रकारापासून रोखण्याचा केला होता प्रयत्न !

मुंबई दि.११ उस्मानाबाद जिल्ह्यातील तरूण शेतकरी ज्ञानेश्र्वर साळवे याने काल मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर केलेल्या आत्महत्या नाट्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला होता. तटकरे यांनी अशी कृती करण्यापासून त्या तरूणाला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र ज्ञानेश्र्वर साळवे याने मोबाईल बंद केला आणि थेट मंत्रालयाचा सातवा मजला गाठला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले की, मी उस्मानाबादच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, ज्ञानेश्वर साळवे हा राष्ट्रवादीचा क्रियाशील कार्यकर्ता नाही. दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद निवडणूकांच्यावेळी तो पक्षात आला. पण त्यांनंतर त्याचा पक्षाशी कोणताही संबंध आला नाही. काल दुपारी मला एक फोन आला. समोरून बोलणारा व्यक्ती “मी मंत्रालयात जाऊन आत्महत्या करणार” असल्याचे मला सांगत होता. मी त्याला वय विचारले तो म्हणाला २२ वर्षे तेव्हा मी त्याला म्हटले एवढ्या तरूणपणी तू का आत्महत्या करतोय. तेव्हा त्याने मला कृषीमंत्री भेटत नसल्याच सांगितले. त्यावेळी तुम्ही आम्हाला भेटा तुमची समस्या घेऊन आम्ही तुम्हाला कृषीमंत्र्यांकडे घेऊन जातो असे मी सांगितले. त्याला समजावले. पण त्याने फोन बंद केला. त्यानंतर जो काही प्रकार झाला तो सर्वांनी पाहीला. राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा कुठल्याही गोष्टीला समर्थन देत नाही असे सांगतानाच ज्ञानेश्र्वर साळवेचा राष्ट्रवादी पक्षाशी कोणताही संबंध नाही असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

Previous articleतर राष्ट्रवादीला ज्ञानेश्वर साळवेचा अभिमान आहे
Next articleसावित्रीबाई फुले विद्यापीठातील “शाकाहारी” संदर्भातील परिपत्रक २००६ चे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here