फेरीवाला मुद्यावरुन शिवसेना मनसेत “सामना” रंगणार !

फेरीवाला मुद्यावरुन शिवसेना मनसेत “सामना” रंगणार !

मुंबई दि.१२  मुंबई शहर, उपनगर आणि रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाला मुद्यावरुन शिवसेना आणि मनसेत सामना रंगण्याची शक्यता आहे. या प्रश्नी शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात होती. मात्र आता शिवसेना फेरीवाल्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरणार आहे.’मुंबई फेरीवाला सेना’ या संघटनेने फेरीवाल्यांच्या बाजूने लढा देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. शिवसेना फेरीवाला सेनेचे अध्यक्ष अशोक देहेरे यांनी ही माहिती दिली.

‘मुंबई फेरीवाला सेना’ या शिवसेनेच्या नोंदणीकृत संघटनेने फेरीवाल्यांच्या बाजूने लढा देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. मुंबई फेरीवाला सेना या संघटनेची बैठक आज गोरेगाव येथे होणार होती परंतु काही कारणास्तव ही बैठक झाली नाही मात्र फेरीवाल्यांवर सध्या होत असणारी कारवाई थांबवून अधिकृत फेरीवाल्यांना तातडीने पर्यायी जागा द्यावी अशी जोरदार मागणी या संघटनेच्या वतीने  करण्यात आली. मुंबईतील फेरीवाल्यांचा २००० साली सर्वे करण्यात आला होता. २०१४ मध्ये फेरीवाला संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हाॅकर्स झोन संदर्भात निर्णय घेतला होता.त्यानुसार अशा सर्वे झालेल्या अधिकृत फेरीवाल्यांना महानगरपालिकेने पर्यायी जागा द्यावी.ज्यांच्याकडे पुरावे आहेत अशा फेरीवाल्यांना प्रथम जागा द्यावी नंतरच त्यांना हटवा अशी मागणी मुंबई फेरीवाला सेनेचे अध्यक्ष अशोक देहेरे यांनी केली आहे.या संदर्भात लवकरच पोलीस आयुक्त , मनपा आयुक्त यांची भेट घेवून पर्यायी जागा देण्याची मागणी करणार असल्याची माहिती या संघटनेचे अध्यक्ष अशोक देहरे यांनी दिली आहे.मनसेने सुरू केलेल्या आंदोलनानंतर सध्या अधिकृत फेरीवाल्यांवरही महानगरपालिका प्रशासन कारवाई करत आहे. यामध्ये अनेक मराठी फेरीवाले आहेत. त्यांचे रोजीरोटीचे साधनच हिरावून घेतले जात आहे असून, त्यांचे जगणे असह्य झाले असल्याने आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या बाजूने लढा देणार असल्याची भूमिका शिवसेनाप्रणित संघटनेने मांडली आहे.

एल्फिन्स्टन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा बळी गेल्यानंतर रेल्वे स्टेशन बाहेरील अनधिकृत फेरीवाले हटविण्याच्या मागणीसाठी मनसेने संताप मोर्चा काढून रेल्वे प्रशासनाला इशारा दिला होता. त्यानंतर फेरीवाल्यांच्या समर्थनात मुंबई काॅग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी उडी घेतल्याने मनसे आणि काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली होती.आता अधिकृत फेरीवाल्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय शिवसेनेच्या मुंबई फेरीवाला सेना या संघटनेने घेतल्याने भविष्यात शिवसेना आणि मनसे मध्ये “सामना” रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

Previous articleसावित्रीबाई फुले विद्यापीठातील “शाकाहारी” संदर्भातील परिपत्रक २००६ चे
Next articleगुजरात में फटी तो जीएसटी घटी’ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here