गुजरात में फटी तो जीएसटी घटी’ 

गुजरात में फटी तो जीएसटी घटी’ 

सामनातून भाजपला टोला

मुंबई दि.१३ वस्तु व सेवा कर अर्थात जीएसटी वरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. या कर प्रणालीमुळे  गरीब जनता व लहान, मध्यम व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या विरोधात गुजरात मधिल लहान व्यापारी रस्त्यांवर उतरला. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसेल आणि पैशांचा पाऊस पाडूनही मतांची रोपटी उगवणार नाहीत या भयानेच जीएसटी प्रकरणी सरकार झुकले आहे. आम्ही त्या झुकण्याचे व गुजरातच्या जनतेचे अभिनंदन करतो, पण कालपर्यंत जे देशाचे दुश्मन व अर्थव्यवस्थेचे मारेकरी होते त्यांच्या पुढे का झुकलात, ते प्रथम सांगा असा सवाल करतानाच ‘गुजरात में फटी तो जीएसटी घटी’ हेच या प्रश्नाचे उत्तर आहे असा घणाघाती टोला शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केंद्रातील सरकारला लगावला आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात

‘ वस्तु व सेवा कर प्रणाली अर्थात जीएसटी’ अभेद्य असून, जीएसटीच्या कर प्रणालीत यापुढे कसलाही बदल होणार करणार  नाही. जीएसटीला सामान्य लोकांचा पाठिंबा असून दलाल आणि करबुडवे व्यापारीच जीएसटीच्या विरोधात आकांडतांडव करीत आहेत’, असे कालपर्यंत सांगणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने याप्रश्नी सरळ ‘यू टर्न’ घेतला आहे. जीएसटीतील काही सैतानी तरतुदींना विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना देशाचे शत्रू वगैरे ठरविण्यापर्यंत केंद्रातील  सरकारची आणि  त्यांच्या मंत्र्यांची मजल गेली होती. आपणच कौटिल्याचे बाप असून, देशाचे व गरीबांचे अर्थशास्त्र फक्त आम्हालाच समजते अशा तोऱ्यात वावरणाऱ्या केंद्रातील सरकारचे गर्वहरण शेवटी जनतेनेच केले अशा शब्दात भाजपाचा समाचार या अग्रलेखात घेण्यात आला आहे.

जीएसटीमुळे सर्वसामान्य जनतेला हैराण झाली होती. त्यांच्या तीव्र विरोधामुळेच सरकार झुकले आणि २८ टक्क्यांचा सर्वात उच्च जीएसटी दर असलेल्या १७७ वस्तू त्यामधून वगळण्यात आल्या आणि १८ टक्के जीएसटी असलेल्या गटात सामील करण्याचा निर्णय ‘जीएसटी’ परिषदेने घेतला. या निर्णयामुळे छोटय़ा व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे ढोल सत्ताधारी पक्षातर्फे वाजविले जात आहेत. कोणत्याही विषयात राजकीय लाभ व प्रसिद्धी कशी मिळवायची यामध्ये भाजपा आघाडीवर आहे. किंबहुना साखरपुडय़ालाच पाळणा आणून बारशाचे सोपस्कार आटोपून स्वतःच्या कर्तृत्वाचे पेढे वाटावेत या भाजपच्या मंडळींनीच, अशा खरपूस  शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.

जीएसटीच्या प्रश्नावर सरकार कधीच झुकणार नव्हते लोकांचा आणि व्यापाऱ्यांचा विरोध गेला उडत असे सांगणारे सरकार इतके नरमले कसे असा सवाल उपस्थित करून, गुजरात निवडणुकीत त्यांना होत असलेला प्रखर विरोध यामुळेच जीएसटी कमी करावा असा टोला या अग्रलेखात लगावण्यात आला आहे.

Previous articleफेरीवाला मुद्यावरुन शिवसेना मनसेत “सामना” रंगणार !
Next articleमंत्रिमंडळ विस्तारावर आजच्या बैठकीत होणार चर्चा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here