सभा घेणारच… येत्या शनिवारी तीही ठाण्यातच !

सभा घेणारच… येत्या शनिवारी तीही ठाण्यातच !

मनसेचा इशारा

मुंबई दि. १३ फेरीवाला प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर येत्या १८ नोव्हेंबरला ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेच्या जागेवरुन वाद सुरु झाला आहे.ठाणे पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळील किंवा तलावपाळी मार्गावर मनसेला सभा आयोजित करायची आहे. मात्र रस्त्यावरील सभेला परवानगी देणार नाही अशी भूमिका ठाणे पोलिसांनी घेतली असतानाचआम्ही सभा घेणारच… तीही ठाण्यातच, येत्या १८ नोव्हेंबर ला असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी विविधप्रकारे अडथळे आणले जात आहेत. जिथे एरवी इतर पक्षांच्या सभांना परवानगी मिळते तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच आडकाठी का असा सवाल मनसेचे नेते अमेय खोपकर उपस्थित केला असून, आमच्या लढ्यामुळे कुणाचे हितसंबंध दुखावलेत, माफियांचे की भ्रष्ट यंत्रणेचे? एकीकडे सरकारविरोधी कुणी बोलले तर त्यावर सत्तेचा बडगा पडतोय. पण सरकारनेही हे समजून घ्यावे की ज्या लोकशाहीचे उठता बसता तुम्ही ‘संदर्भ’ देता त्याच लोकशाहीत भूमिका मांडणाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होतोय. मग ही लोकशाही मुल्यांची पायमल्ली नाही का असा प्रश्न उपस्थित करत,आम्ही सभा घेणारच… तीही ठाण्यातच, येत्या १८ नोव्हेंबर ला असा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला आहे.

Previous articleयापुढे कोठडीत मृत्यू होवू नये म्हणून उपाय योजना करणार !
Next articleअनिकेत कोथळे हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here