हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार ?

हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार ?

मुंबई दि. १४ गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या निवडणूका, सध्या सरकारच्या विरोधात निर्माण झालेले वातावरण , येत्या ११ डिसेंबर पासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यास अधिवेशनाच्या तोंडावर शिवसेनेची नाहक नाराजी ओढवून घेण्यापेक्षा वर्ष अखेरीस म्हणजेच हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय काल रात्री झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीमध्ये घेतल्याचे समजते.

काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली.या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री एकनाथ खडसे , महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे उपस्थित होते.

पक्षाच्या विरोधात तयार होत असलेले वातावरण पाहून गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभेचे निवडणूक निकाल येईपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करू नये असे मत एका ज्येष्ठ नेत्याने या बैठकीत मांडल्याचे समजते. गुजरात व हिमाचलचे निकाल १८ डिसेंबरला लागणार आहेत. तर राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबर पासून सुरू आहेत. राणे यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ समावेशामुळे शिवसेनेने टोकाची भूमिका घेतल्याने त्यांचा समावेश झाल्यास अधिवेशनाच्या तोंडावर सेनेकडून दगाफटका झाल्यास सरकारच अडचणीत येवू शकते यावरही या बैठकीत उदापोह झाल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्जमाफी वरून सध्या सरकारच्या विरोधात वातावरण असल्याचा मुद्दाही या बेठकीत उपस्थित करण्यात आला.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या चौकशी अहवालावर कसलीही अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने अशा परिस्थितीत राणेंना मंत्रिमंडळात समावेश करून महत्वाचे खाते देण्यास एका ज्येष्ठ नेत्याने विरोध केल्याचे समजते.अशा मध्येच राणेंचा मंत्रिमंडळात समावेश केल्यास शिवसेनेची नाहक नाराजी ओढवून घेण्यापेक्षा अधिवेशनापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार लाबवावा असा निर्णय काल रात्री झालेल्या कोअर कमिटीमध्ये झाल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार आता अधिवेशनानंतर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Previous articleवर्षा निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्ताराच्या खलबतांना सुरूवात !
Next articleपोटनिवडणूकीच्या निमित्ताने सेना भाजपात “दिलजमाई”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here