मुलांना तंबाखू सेवनापासून वाचविण्यासाठी “कोटपा” कायद्याची अंमलबजावणी करणार

मुलांना तंबाखू सेवनापासून वाचविण्यासाठी “कोटपा” कायद्याची अंमलबजावणी करणार

डॉ. रणजीत पाटील यांची माहिती

मुंबई दि.१४ राज्यात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीवर अंकुश ठेवणारे अनेक कायदे आहेत. तरी त्याची छुप्या मार्गाने विक्री होते. त्यात प्रामुख्याने मुलांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे भविष्यात मुलांना तंबाखू सेवनापासून वाचविण्यासाठी सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ (कोटपा) तसेच जे जे अक्ट कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची येथे सांगितले. तंबाखूची अवैध  विक्री रोखण्यासाठी लवकरच एक हेल्प लाईन सुरू केली जाईल असेही ते म्हणाले.

बाल दिनानिमित्त टाटा कॅन्सर रुग्णालय आणि संबंध हेल्थ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी टाटा रुग्णालयात  तंबाखू पासून मुलांचे संरक्षण या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टाटा कॅन्सर रुग्णालयाचे संचालक डॉ. आर. ए. बडवे, संबंध हेल्थ फाऊंडेशनचे विश्वस्थ संजय सेठ, चित्रपट निर्माते पुनित मल्होत्रा, सीपीए  संस्थेच्या अनिता पीटर, डॉ. अतुल यादगिरे, विधानभवन मुख्य सुरक्षा पोलिस अधिकारी प्रविण पाटील, मुख्याधापक मगर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना गृहराज्य मंत्री रणजीत पाटील यांनी गंभीरपणे उत्तरे दिली. तंबाखूच्या अवैध विक्रीमुळे मुलांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यावर उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले की, तंबाखू सेवनापासून मुलांना लांब ठेवण्यासाठी शाळेप्रमाणेच पालकांनी देखील  काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. केवळ शाळेच्या १०० यार्ड परिसरात सिगारेट तंबाखूजन्य पदार्थानावर बंदी घालून चालणार नाही. तर ही अवैध विक्री रोकण्यासाठी त्या शहरात किंवा संपूर्ण गावातच तंबाखूजन्य पदार्थ लहान मुलांना विक्री करण्यास बंदी घालणायची आवश्यकता  असल्याचे त्यांनी सांगितले. तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ (कोटपा) तसेच जे जे अक्ट नुसार राज्यात मुलाचे संरक्षण केले जाते. मात्र, या कायद्यांची हवी तशी कठोर अंमलबजावणी होत नाही. त्याचा परिणाम सर्वसामान्यांप्रमाणेच श्रीमंत कुटुंबातील मुलांवर होत आहे. त्यामुळे यापुढे कोटपा आणि जे जे अक्ट ची कठोर अंमलबजावणी करीत मुलांचे संरक्षण केले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी लवकरच राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली जाणार असून या कायद्याची अंमलबाजवणी करणाऱ्या पोलिस अधिकारी यांची कार्यशाळा घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

————————————————–
तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री रोखण्यासाठी हेल्प लाईन

राज्यात सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादकांची अवैध विक्रीवर रोख लावण्यासाठी कोटपा किंवा जे जे अक्ट सारखे प्रभावी कायदे आहेत. मात्र तरी सुद्धा अनेक छुप्या मार्गाने ही विक्री सुरू असते. त्याची माहिती दक्ष नागरिकांना असते. ती शासनाला कळावी यासाठी एक हेल्प लाईन सुरू करण्याचा आमचा मानस आहे. या टेलीफोनिक हेल्प लाईन वर  माहिती देण्याऱ्यांची नावे आणि पत्ता गुप्त ठेवण्यात येईल अशी माहितीही गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी यावेळी दिली.

———————————————————————————
महाराष्ट्रात ७६ हजार ४८०  शाळा तंबाखूमुक्त

तंबाखू नियंत्रणासाठी महाराष्ट्राभर विविध माध्यमातून कार्य सुरु आहे. लहान मुलांना शालेय वयातच तंबाखूच्या दुष्परिणामांची ओळख करून दिल्यास ते या सेवनाच्या आहारी जाण्याचा शक्यता कमी असते. राज्य सरकारने या कामात पुढाकार घेतला असून जवळपास महाराष्ट्रात ७६ हजार ४८०  शाळा तंबाखूमुक्त झाल्या असल्याचे सांगत संबंध हेल्थ फाऊंडेशनचे विश्वस्थ संजय सेठ यांनी राज्य शासनाचे कोतुक केले.

———————————
महाराष्ट्रात ७६ हजार ४८०  शाळा तंबाखूमुक्त

ग्लोबल हेल्थ सर्वे २०१७नुसार भारतात २८. ६ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. ही संख्या खुपच भयावह आहे. तंबाखू पाकिटावर ८५ टक्के सचित्र धोक्याची सूचना देऊन सुध्दा ६१. ९ टक्के पैकी केवळ ५३.८ टक्के लोकांनी तंबाखू सोडण्याचा विचार केला असल्याचे टाटा कॅन्सर रुग्णालयाचे तज्ञ्  डॉक्टर पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले

Previous articleराज्यातील १०७ सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारची मान्यता
Next articleमराठा समाजाच्या ९० टक्के मागण्यांवर कार्यवाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here