राज ठाकरे यांची सभा गडकरी रंगायतन समोर होणार

राज ठाकरे यांची सभा गडकरी रंगायतन समोर होणार

ठाणे दि.१४  ठाण्यात येत्या शनिवारी  १८ नोव्हेंबरला होणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेची जागा निश्चित झाली आहे. हि सभा गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावर निश्चित करण्यात आली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावर निश्चित करण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नौपाडा पोलिसांची भेट घेतल्यानंतर गडकरी रंगायतन येथील सभेला पोलिसांनी अखेर हिरवा कंदील दिला आहे.हि सभा ठाणे स्टेशन परिसरात घेण्याचे ठाणे येथिल मनसेच्या पदाधिका-यांनी निश्चित केले होते. तेव्हा सभेला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, याच ठिकाणी सभा व्हावी यासाठी मनसेचे पदाधिकारी प्रयत्नशील होते. काल मनसे पदाधिकारी आणि पोलीस वरिष्ठअधिकारी यांच्या मध्ये बैठकही झाली. त्यानंतर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी ठाण्यात येऊन सभेच्या जागेची पहाणी केली. त्यानंतर रंगायतन समोरील जागेला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली.

Previous articleमराठा समाजाच्या ९० टक्के मागण्यांवर कार्यवाही
Next articleमंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदिल मिळणार ?