मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदिल मिळणार ?

मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदिल मिळणार ?

दिल्ली दि.१४ राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा कंदिल दाखविण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीच्या दौ-यावर आहेत तर; पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौ-यावर आहेत.ते आज बुधवारी सकाळी दिल्लीत दाखल होत असून , सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

राज्यातील विविध प्रकल्पांच्या मान्यतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौ-यावर आहेत. त्यांनी काल मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, यांची भेट घेवून राज्यातील विविध प्रकल्पांसाठी भरीव मदत मंजूर करून घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री मुंबईला परतणार होते मात्र ते आज बुधवारी दिल्ली मुक्कामी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौ-यावर असून, ते आज बुधवारी सकाळी दिल्लीत परतणार आहेत. त्यामुळे सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधान मोदी यांची भेट घेवून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार असल्याचे समजते. शिवसेनेला शह देण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाचा निर्णय आजच्या बैठकीत होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

Previous articleराज ठाकरे यांची सभा गडकरी रंगायतन समोर होणार
Next articleविधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी ७ डिसेंबरला मतदान