विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी ७ डिसेंबरला मतदान

विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी ७ डिसेंबरला मतदान

मुंबई दि.१५ माजी मुख्यमंत्री नारायण यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

गेल्या २२ सप्टेंबर रोजी काॅग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत नारायण राणे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.या निवडणूकीचा कार्यक्रम केंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.त्यानुसार येत्या २० नोव्हेंबरला याची अधिसूचना जारी करण्यात येणार असून,२९ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. गुरूवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात येवून सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल.

विधानसभेत असणारे पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे-

भाजप-१२२ , शिवसेना-६३,काॅग्रेस-४२, राष्ट्रवादी-४१,शेकाप-३,बविआ-३,एमआयएम-२,अपक्ष-७, सपा-१,मनसे-१,रासपा-१,कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया-१

Previous articleमंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदिल मिळणार ?
Next articleभाजपा प्रवेशासाठी ५ कोटींची ऑफर ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here