राज्यात खरंच कायद्याचे राज्य आहे का ? 

राज्यात खरंच कायद्याचे राज्य आहे का ? 

शरद पवारांचा सरकारला सवाल

गडचिरोली दि.१५ सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरण तर खूपच धक्कादायक आहे, आजच्या वर्तमानपत्रामध्ये नागपूरमध्ये काही हत्या झाल्याचे वाचले. या सर्व गोष्टी पाहता या राज्यात कायदयाचे राज्य आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवार यांच्या चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून गडचिरोली येथून सुरुवात झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. राज्यात अशा घटना घडत आहेत त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी घेवून प्रतिक्रिया देणे गरजेचे होते. पण त्यांच्याकडून एकही प्रतिक्रिया आलो नाही असे म्हणत पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

देशाचा विकासदर खाली आला आहे . खरे तर देशाचा विकासदर ८ टक्क्यांच्या वर असायला हवा. पण तसे न झाल्यामुळे वास्तव लपवण्यासाठी विकास दाखवण्याचे निकष बदलण्यात येत आहेत. मी लाभार्थी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या जाहिरातीमध्ये फार गाजावाजा करण्यात आला आहे.  पण प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीचे किती लाभार्थी आहेत, हे अदयापही कळलेले नाही. तसेच,गोहत्याप्रकरणी केंद्र सरकारने संवेदनशील राहायला हवे. कालही राजस्थानमध्ये एक हत्या घडली आहे. केंद्राने राज्यांना सूचना देवून या घटना थांबवायला हव्यात असा सल्ला पवार यांनी दिला.

दरम्यान गुजरातमध्ये भाजपविरोधी वातावरण आहे. हे चित्र काँग्रेससाठी अनुकुल आहे. आमच्या तिथे दोनच जागा आहेत. या निवडणुकीत काँग्रेससोबत एकत्रपणे लढण्याबाबत आमची चर्चा सुरु आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

Previous articleअपयश लपवण्यासाठी हर्षवर्धन जाधवांकडून “नौटंकी”
Next articleशैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी ‘शिक्षणाची वारी’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here