आ.हर्षवर्धन जाधवांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा

आ.हर्षवर्धन जाधवांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा

धनंजय मुंडे यांची मागणी

मुंबई दि.१५  पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पार्टीवर जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक ते आमदारांना करोडो रूपये देऊन  खरेदी करण्याबाबतचे आरोप होत आहेत. आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही अशाच प्रकारे केलेला आरोप हा अतिशय गंभीर असुन यासर्व आरोपांची  सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

सत्ताधारी पक्षातील सहकारी पक्षाचा एक आमदारच मुख्य सत्ताधारी पक्षाच्या बड्या मंत्र्यावर पाच कोटी रूपयांची ऑफर देऊन  खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करतो, यावरून सत्ताधारी पक्षातील सत्तेसाठीची आणि ती टिकविण्याची चाललेली स्पर्धा लक्षात येत आहे. मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या खरेदीवरूनही या दोन पक्षात असेच आरोप, प्रत्यारोप होत आहेत. कोट्यावधी रूपये देऊन लोकप्रतिनिधींची होणारी ही खरेदी-विक्री अतिशय गंभीर आणि सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाला शरमेने मान खाली लावणारी असल्याची टीका मुंडे यांनी केली आहे.

आपल्या न्याय हक्कासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर बळाचा वापर करून गोळीबार करणाऱ्या सरकारचा विरोधी मुंडे यांनी तीव्र शब्दात निषेध केला असुन या सरकारला आता जनताच जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याप्रकरणी नगरच्या पोलीस अधिक्षकांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

विरोधी पक्षात असताना ऊसाला ३ हजार ४०० रूपये भाव मागणारे आज सत्ताधारी झाल्यानंतर मात्र त्याच ऊसाला ३ हजार १००  रूपये भाव मागणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ्या घालत आहेत, ही शरमेची बाब असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.

Previous articleनारायण राणेंच्या पराभवासाठी शिवसेना काॅग्रेस राष्ट्रवादी एकत्र येणार ?
Next articleग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांना लोकमतचा “मोस्ट स्टायलिश” पुरस्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here