ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांना लोकमतचा “मोस्ट स्टायलिश” पुरस्कार

ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांना लोकमतचा “मोस्ट स्टायलिश” पुरस्कार

मुंबई, दि. १५ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांना दैनिक लोकमतचा महाराष्ट्राज ‘ मोस्ट स्टायलिश पुरस्कार ‘ आज झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटींचा स्टायलिश अंदाज यावेळी बघावयास मिळाला.

ताज लॅण्ड हॉटेलमध्ये लोकमतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यात व सेलिब्रिटींच्या उपस्थितीत ना. पंकजाताई मुंडे यांना मोस्ट स्टायलिश ॲवॉर्ड हा पुरस्कार देण्यात आला. हिंदी चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर व आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्विकारताना आपल्या स्टाईलबाबत त्यांनी आत्मविश्वास आणि साधेपणा व्यक्त करत वेळचे महत्त्वही विषद केले.

लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड २०१७ पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष होते. लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अॅवॉर्ड सोहळ्याचे प्रोग्रेस पार्टनर कार्लटन, स्टार कॉस्मेटिक्स, जॉनी वॉकर तसेच झूम, पिंक व्हिला, अफॅक्स आणि झी मराठी यांनी संयुक्तपणे यात सहभाग घेतला. या सोहळ्यास मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास होता. कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टायलिश पर्सनालिटीजलाच या पुरस्काराचे मानकरी होता आले. या सोहळ्याला चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकार, गायक, संगीतकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील बडी मंडळी उपस्थित होती.

पंकजाताईची मुलासह हजेरी ; अंगाई गीतालाही मिळाली दाद!

या दिमाखदार सोहळ्यात पंकजाताई मुंडे यांनी आपला मुलगा आर्यमान पालवे यासह हजेरी लावली होती. आई – मुलाच्या जोडीने सोहळ्यात उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. पंकजाताईनी उपस्थितांच्या आग्रहा खातर ‘ लिंबोणीच्या झाडामागे, चंद्र झोपला गं बाई ‘ हे खास अंगाईगीत गायले, त्याला उपस्थितांनी मनमुराद दाद दिली.

Previous articleआ.हर्षवर्धन जाधवांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा
Next articleशेतक-यांचे आंदोलन हाताळण्यात प्रशासनाला अपयश आल्यामुळेच हिंसक वळण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here