बोंडअळी आणि तणनाशकामधील फरक न समजणाऱ्या सदाभाऊंची बौध्दीक क्षमता चाचणी घ्या 

बोंडअळी आणि तणनाशकामधील फरक न समजणाऱ्या सदाभाऊंची बौध्दीक क्षमता चाचणी घ्या 

मुंडेंनी सदाभाऊंना फटकारले

मुंबई दि. १५ बोंडअळी आणि तणनाशकामधील फरक न समजणारे कृषी राज्यमंत्री या राज्याला लाभले ही या राज्याची शोकांतिका असून, सरकारने शासकीय खर्चाने कृषी राज्यमंत्र्यांची बौध्दीक क्षमता चाचणी तपासून घ्यावी अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सदाभाऊ खोत यांना फटकारले आहे.

राज्यात बोंडअळीच्या निर्माण झालेल्या भीषण संकटाच्या पार्श्वभूमीवर श्री.मुंडे यांनी, बीटी बियाणाला बोंडअळी दाद देत नसल्याबाबत केंद्रीय कापुस संशोधन संस्थेने आपला अहवाल डिसेंबर २०१५ मध्ये शासनाला देऊनही सरकारने काहीच कारवाई न करता हा अहवाल दाबल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी केला होता. या बाबत आपण शासनाला शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ६ जुलै रोजी पत्र लिहुन अवगत केले असतानाही शासनाने त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे बीटी बियाणावरील प्रार्दुभावामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीस व जिवीतहानीस शासनच जबाबदार असून, हा एक मोठा कॉटन सीड स्कॅम असल्याचा आरोपही मुंडे यांनी करून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.

मुंडे यांच्या या आरोपामुळे हादरलेल्या कृषी राज्यमंत्र्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतील या संबंधीच्या त्यांच्या मुद्यांचाही समाचार घेतला. आपण बोंडअळी बद्दल बोलत असताना कृषी राज्यमंत्र्यांच्या प्रेस नोटमध्ये मात्र त्याचा उल्लेख नाही तर ते तणनाशकाबद्दल बोलत आहेत. बोंडअळी  आणि तणनाशक यामधील फरक सदाभाऊंना नक्कीच समजत असणार असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला. मुळात आपण पाठवलेले ६ जुलै २०१७ रोजीचे पत्र हे सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ कॉटन रिसर्च, नागपूर या कापूस संशोधनातल्या केंद्र शासनाच्या शिखर संस्थेच्या शास्त्रज्ञ डॉ.के.आर.क्राथी यांनी इंडिया कॉन्सिल ऑफ ॲग्री कल्चरल रिसर्च यांच्यासह आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यात कापुस पिकाचा अभ्यास करून १ डिसेंबर २०१५ रोजी प्रकाशित केलेल्या अहवाला संदर्भात होते. सदर अहवालात क्रांथी यांनी बीटी कॉटन बियाणामुळे बोंडअळीला व विशेषत्वाने तांबड्या बोंडअळीला आळा बसल्याने गेल्या तीस वर्षात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले होते. तथापि, सन २०१४-१५ पासून बीटी कॉटन बियाणातील संबंधित जीन व रसायने यांना बोंडअळी व तांबडी बोंडअळी दाद देईनाअशी झाल्याने कापुस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. पिकाच्या उत्पादक अवस्थेत बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रार्दुभाव झाल्याने उत्पादनात घट तर येतेच पण उत्पादनाचा दर्जा घसरल्याने त्याला बाजारभाव देखील कमी मिळत असल्याचे निरीक्षण देखील त्यांनी नोंदवले आहे. महाराष्ट्रात देखील कापुस उत्पादक पट्यात गेल्या दोन ते तीन वर्षात मोठ्या प्रमाणावर बोंडअळीचा प्रार्दुभाव होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे  दिसून आले आहे. उत्पादनाच्या अंतिम टप्यात आलेल्या पिकावर अळीचा प्रार्दुभाव दिसून आल्याने शेतकरी पॅनिक होऊन तीव्र, अतितीव्र, प्रमाणित, अप्रमाणित किटकनाशकांची, किटकनाशकांच्या मिश्रणांची फवारणी पीक वाचवण्यासाठी करतात. अशाच धडपडीत राज्यातील विविध भागात कापुस उत्पादक शेतकऱ्यांचे विषबाधेने मोठ्या प्रमाणात बळी गेले असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

डॉ.क्रांथी यांच्या अहवालाची वेळीच दखल घेऊन शासनाने त्यानुसार कारवाई केली असती तर विषबाधेने शेतकऱ्याचे झालेले मृत्यु रोखता आले असते. डॉ.क्राथी यांच्या अहवालावर शासनाने तीन वर्षात कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे विषबाधेने झालेल्या शेतकऱ्यांच्या सर्व मृत्युंना शासन जबाबदार आहे त्यामुळे डॉ.क्रांथी यांच्या  अहवालावर त्वरीत कार्यवाही करावी, बहुतांश कापसाचा पेरा जुलैपर्यंत झालेला असल्याने बीटी बियाणांच्या धोक्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृतीचा कार्यक्रम हाती घ्यावा अशीच मागणी मी सदर पत्राद्वारे केली होती. बीटी बियाणाचा व तणनाशकाचा दुरान्वयेही संबंध नाही. असे असतानाही त्यांचा सुतराम संबंध जोडुन दिशाभुल करण्याचा प्रकार मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला असावा असा आरोप करून किंवा मुळातच त्यांची आकलन शक्ती कमी असावी अशी शंका घेण्यास जागा असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. वार्षिक ५ ते ६ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या बीटी बियाणांच्या कंपन्यांच्या अमिषाला बळी न पडता शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक व जिवीताचे नुकसान सरकारने थांबवावे असे आवाहन करताना सदाभाऊंनी हा अहवाल आधी वाचावा असा सल्लाही दिला आहे.

Previous articleशेतक-यांचे आंदोलन हाताळण्यात प्रशासनाला अपयश आल्यामुळेच हिंसक वळण
Next articleऊस दर नियंत्रण संदर्भात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here