धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या विरोधात तक्रार
मुंबई दि.२० राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर समाज माध्यमातून अश्लाघ्य, आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसात तक्रार दाखल केली असून, सायबर पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद केली आहे.
वालचंद गित्ते या व्यक्तीने ट्विटर वरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर अश्लील भाषेत टीका करण्यात आली होती. या विकृत व्यक्तीविरोधात बांद्रा कुर्ला काॅम्लेक्स येथील सायबर सेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिली. समाज माध्यमावर अशा प्रकारे आमच्या नेत्यांवर झालेली टीका आम्ही सहन करणार नाही.सायबर पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद केली असून, लवकरच या तक्रारींवर कारवाई करू असे सायबर सेल पोलिसांनी सांगितले असे वाघ यांनी स्पष्ट केले.