गुजरात मध्ये भाजपाला यश मिळेल

गुजरात मध्ये भाजपाला यश मिळेल
रामदास आठवले यांचा दावा

मुंबई दि. २२ मराठा समाजासह विविध घटकांना आरक्षण द्यावे अशी भूमिका वीस वर्षापूर्वी मांडली होती, असे स्पष्ट करतानाच गुजरातमध्ये आरपीआयने भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपच्या मतांमध्ये वाढ होवून गुजरात मध्ये भाजपलाच यश मिळेल असा दावा केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

गुजरात निवडणूकीत रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाने भाजपला पाठिंबा दिला आहे. आम्ही पाठिंबा दिल्याने भाजपच्या मतांमध्ये सुमारे ८ टक्क्यांनी वाढ होवून गुजरात मध्ये भाजपलाच यश मिळेल असा दावा केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.पाटीदार समाजाला कॅांग्रेसमुळे नाही तर भाजपमुळेच आरक्षण मिळणार असल्याने आपण लवकरच गुजरातमध्ये प्रचाराला जाणार असल्याने त्यावेळी हार्दिक पटेल याची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने वस्तु व सेवा कर कमी केल्याने गुजरात मधिल व्यापारी वर्ग खूष असल्याचेही ते म्हणाले.

Previous articleमाजी आ.रमेश कदम यांचा समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश
Next articleमनसेचा दणका! बिस्लेरी बाटल्यांवरील लेबल्स मराठीत 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here