बिस्लेरीवरून मनसे आणि स्वाभिमान संघटनेत श्रेयवादाची लढाई

बिस्लेरीवरून मनसे आणि स्वाभिमान संघटनेत श्रेयवादाची लढाई

मुंबई दि.२२ अनधिकृत फेरीवाला आंदोलनानंतर मनसेने आता बाटलीबंद पाणी विक्री करणा-या कंपन्यांच्या लेबलकडे मोर्चा वळवला असून, बिस्लेरीने आमच्या दणक्यानंतर बिस्लेरीच्या बाटलीवर मराठीत नाव छापल्याचा दावा मनसेच्यावतीने केला होता. आता बिस्लेरी कंपनीच्या मराठी नावावरून नव्या श्रेयवादाला तोंड फुटले आहे. बिस्लेरी कंपनीने राज्यात मराठी भाषेत कंपनीचे नाव छापण्याची मागणी “स्वाभिमान संघटनेनी’ प्रथम केली होती असा दावा अध्यक्ष आ. नितेश राणे यांनी पुराव्यासह केला आहे.

बिस्लेरी कंपनीला यासंदर्भात पाठविलेले पत्रच आ.नितेश राणे यांनी समाज माध्यमांवर प्रसिध्द केल्याने आता बिस्लेरीच्या मराठी करणाचे श्रेय घेण्यासाठी मनसे आणि स्वाभिमान संघटनेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली असल्याचे चित्र आहे.

Previous articleखरंच हेच का `अच्छे दिन’ ?
Next articleमहाराष्ट्राची “जादू ” गुजरात मध्ये चालणार का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here