महाराष्ट्राची “जादू ” गुजरात मध्ये चालणार का ?

महाराष्ट्राची “जादू ” गुजरात मध्ये चालणार का ?

भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील ३६ जादूगारांची टीम

मुंबई दि २३ गेल्या लोकसभा निवडणुकीत समाज माध्यमांचा आधार घेत बहुमताच्या पुढे मजल मारणा-या भाजपने गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील जादूगारांचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरात मधिल मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने पारंपारिक पद्धतींचा अवलंब सुरु केला आहे. भाजपने ‘विकासाची जादू’ हे नवे प्रचार अभियन सुरु केले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील जादूगारांची मदत घेतली जाणार आहे. गुजरातच्या ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी जादूच्या प्रयोगांचा आधार घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे ‘विकासाची जादू’ दाखविण्यासाठी महाराष्ट्रातील जादूगारांना आमंत्रित करण्यात आल्याने गुजरात निवडणूकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जादूगारांना “अच्छे दिन” आले आहेत.

महाराष्ट्रातील ३६ जादूगारांची टीम गुजरातच्या ग्रामीण भागांमध्ये आपली विकासाची कमाल दाखवणार आहेत. जादूचे प्रयोग करुन त्यामधून भाजप सरकारने केलेला विकास सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम हे जादूगार करणार आहेत. गुजरातमध्ये भाजप सत्तेत आहे. या काळात झालेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपने ‘जादूच्या प्रयोगांचा’ आधार घेतला आहे. या माध्यमातून १४४ विधानसभा मतदारसंघामध्ये हे जादूगार प्रचार करणार आहे. दोन टप्प्यांमध्ये हा प्रचार केला जाईल. ‘विकासाच्या जादूचा प्रयोग’ साधारणत: २५ ते ३० मिनिटांचा असणार आहे. ‘ग्रामीण भागातील जनतेपर्यंत भाजपचा विकास पोहचविण्यासाठी जादूचा आधार घेतला जात आहे. या माध्यमातून मतदारांना भाजपच्या कार्यकाळात झालेला विकास दाखवला जाईल.

Previous articleबिस्लेरीवरून मनसे आणि स्वाभिमान संघटनेत श्रेयवादाची लढाई
Next articleकर्जमाफीला अजून १५ दिवसाचा कालावधी लागणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here