कर्जमाफीला अजून १५ दिवसाचा कालावधी लागणार

कर्जमाफीला अजून १५ दिवसाचा कालावधी लागणार

चंद्रकांत पाटील

उस्मानाबाद दि.२३ राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर या योजनेची अंलबजावणी होण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या असतानाच कर्जमाफीला अजून १५ दिवसाचा कालावधी लागेल असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

कर्जमाफीच्या प्रत्यक्षात दिरंगाईला सरकार जबाबदार नाही असे विधान पाटील यांनी करून याचे खापर अप्रत्यक्षपणे प्रशासनावर फोडले. आज ते उस्मानाबादमध्ये बोलत होते.कर्जमाफी योजनेतील घोळ वाढतच असून, एकीकडे शेतक-यांच्या आत्महत्येचा आकडा दररोज वाढत असतानाही कर्जमाफी योजनेची रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तर अनेक शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम सरकारने लगोलग परत घेतली आहे. त्यामध्ये महसूलमंत्री पाटील यांनी कर्जमाफीला आणखी १५ दिवस लागतील असे सांगितल्याने शेतक-यांपुढील अडचणीत वाढ होणार आहे.रिलायन्स आणि टाटा सारख्या खासगी कंपनींच्या मार्फत सोयाबीन, उडीद, मूग व इतर धान्य विकत घेण्याचा प्रस्ताव सरकारनकडे मांडण्यात आला आहे.  सरकार या प्रस्तावावर विचार करीत असून येत्या वर्षीपासून त्याच्यावर अंमलबजावणी होणार आहे अशी माहिती पाटील यांनी दिली.

Previous articleमहाराष्ट्राची “जादू ” गुजरात मध्ये चालणार का ?
Next articleसंघात गाढव आले तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here