वसंतराव डावखरेंची प्रकृती गंभीर पण स्थिर

वसंतराव डावखरेंची प्रकृती गंभीर पण स्थिर

मुंबई दि.२३ विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांना प्रकृती अस्वस्थामुळे येथिल बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागात जीवनरक्षक प्रणाली वर ठेवण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज त्यांची भेट घेतली

विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्यावर वर्षभरापासून उपचार सुरु आहेत. मुत्रपिंडाच्या विकाराने ते ग्रस्त असून, त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात मुत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आलो होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना संसर्गाचा त्रास झाल्यामुळे गेली अनेक दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे.काल बुधवारी पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना येथिल बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. आज त्यांना श्वसनाचाही त्रास झाल्याने त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले.डावखरे यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समजताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ठाणे, मुंबई आणि पुण्यातील अनेक राजकीय नेत्यांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Previous article३ ते ५ हजार भरून शेतक-यांना मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची सवलत
Next articleमनसे आरपीआय’ हा एकच प्रयोग शिल्लक !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here