डीएसके “चिटर” नाहीत, त्यांच्या मदतीसाठी मराठी माणसांनी पुढे या!

डीएसके “चिटर” नाहीत, त्यांच्या मदतीसाठी मराठी माणसांनी पुढे या!

राज ठाकरे यांचे आवाहन

पुणे दि.२४ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मराठी बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णींच्या यांच्या मदतीसाठी धावले आहेत. कुलकर्णी हे चिटर नाहीत, तर ते यामध्ये अडकले आहेत. सध्या निर्माण झालेल्या अडचणीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी मराठी माणसांनी पुढे यावे असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

कुलकर्णी हे कुणाचे पैसे बुडवणार नाहीत, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुंतवणूकदारांना केले आहे. कुलकर्णी यांच्याकडे गुंतवणुक केलेल्या पैकी काही गुंतवणूकदारांनी पुण्याच्या दौ-यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात भेट घेतली. राजकीय पुढाऱ्यांशी संबंधित अमराठी लोक कुलकर्णी यांना उध्वस्त करु पहात आहेत. तसे होऊ नये याची खबरदारी आपण घ्यायला पाहीजे’.अडचणीत असलेल्या कुलकर्णी यांच्या पाठी उभे राहण्यासाठी काही ठेवीदार एकवटले आहेत,असे ठाकरे म्हणाले.

Previous articleहिंदूंना दिलेल्या या ‘तिहेरी वचनां’चे काय ?
Next articleराज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here