राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द

शिवसेनेला धक्का

औरंगाबाद दि.२४ राज्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचे आमदार पद उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरवले. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्यमंत्री खोतकर यांची आमदारकी रद्द झाल्याने हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी अर्जून खोतकर यांनी मुदत उलटून गेल्यानंतर उमेदवारी अर्ज भरला, असा आरोप गोरंट्याल यांनी याचिकेत केला होता. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जुन खोतकर यांनी वेळ संपल्यानंतर स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ते निवडणूक लढवण्यास पात्र नाहीत, असे याचिकेत म्हटले होते. या याचिकेवर आज न्यायमूर्ती नलावडे यांनी निकाल दिला. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये खोतकर अवघ्या २९६ मतांनी विजयी झाले होते.

या निकाला विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उच्च न्यायालयाकडून खोतकर यांना ४ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. मी अर्ज दाखल करण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरायला गेलो होतो. अर्ज भरण्यासाठी ३ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली असली तरी शेवटच्या दिवशी जितके जण निर्धारित वेळेत केंद्रावर दाखल होतात, त्या सर्वांचे अर्ज दाखल करून घेतले जातात. मी ३ वाजण्यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या परिसरात होतो. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या माझा अर्ज वैध ठरला पाहिजे, असे खोतकर म्हणाले.

Previous articleडीएसके “चिटर” नाहीत, त्यांच्या मदतीसाठी मराठी माणसांनी पुढे या!
Next article. तर सत्तेला लाथ मारेन आणि जनतेसोबत येईन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here