मुंबई टू गोवा’ जलप्रवास २५ डिसेंबर पासून सुरू होणार!

मुंबई टू गोवा’ जलप्रवास २५ डिसेंबर पासून सुरू होणार!

मुंबई दि. २४ मुंबईतून गोव्यावा जाणा-या प्रवाशांसाठी आनंदायी दिलासा देणारा मुंबई ते गोवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रुझने जलप्रवास येत्या २५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्याला जाणा-या पर्यटकांच्या आनंदात भर पडणार आहे. त्यादृष्टीने मुंबई ते गोवा दरम्यान ठिकठिकाणी ७२ जेट्टी विकसीत करण्यात येत आहेत. या जेट्टींच्या निर्मितीनंतर ७०० किमी समुद्र किनाऱ्यावरुन कोकणात ठिकठिकाणी थांबे घेऊन गोव्यापर्यंत प्रवास करणे शक्य होऊ शकेल. मुंबई ते गोवा दरम्यान प्रस्तावित असलेला जलप्रवास तथा क्रुझ साधारण येत्या २५ डिसेंबरपर्यंत सुरु होईल, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

मुंबई हे महाराष्ट्रासह देशाचे क्रुझ पर्यटनाचे (समुद्रपर्यटन) केंद्र ठरत असून जगातील नामांकीत अशा कोस्टा क्रुझ कंपनीने चालू सिजनमधल्या पहिल्या क्रुझची सुरुवात मुंबईहून आज केली. मुंबई-कोचीन-मालदीव या मार्गाने जाणाऱ्या क्रुझचा शुभारंभ  राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे करण्यात आले. अवघ्या २९ हजार ८०० रुपयात मुंबई ते कोचिन दरम्यान डोमिस्टिक क्रुझचा आनंद मिळवून देणाऱ्या या क्रुझची पहीली फेरी येत्या रविवारी निघणार आहे. चालू सिझनमध्ये मार्च महिन्यापर्यंत मुंबईतून दर पंधरा दिवसांनी एक क्रुझ निघणार आहे.

सेवन स्टार सुविधांनी युक्त ६५४ केबिन्स, १७०० पर्यटक क्षमता

आज सुरु करण्यात आलेले कोस्टा निओ क्लासिका क्रुझ हे मुंबई – कोचिन – मालदिव दरम्यान प्रवास करणार आहे. मुंबई ते कोचिन दरम्यानचा क्रुझ प्रवास फक्त २९ हजार ८०० रुपयांचा असून त्यात ४ दिवस आणि ३ रात्री क्रुझचा आनंद घेता येणार आहे. तसेच मालदिवपर्यंतच्या ८ दिवस आणि ७ रात्रीच्या क्रुझचा दर हा ४५ हजार रुपये इतका आहे. मुंबईतून दर पंधरवड्यात रविवारी हे क्रुझ निघणार असून चालू सीझनमध्ये ही पर्यटन प्रवासी सेवा मार्च २०१८ पर्यंत असेल. कोस्टा निओ क्लासिका या जहाजात ६५४ केबिन्स असून १ हजार ७०० पर्यटक प्रवास करु शकतात. या केबिन्समध्ये समुद्राचा व्ह्यू दिसणाऱ्या केबिन्स आणि स्वतंत्र बाल्कनी असलेल्या सुटचा समावेश आहे. हे जहाज कॅसिनो, चित्रपटगृहे, डिस्को, बॉलरुम, ग्रँड बार यांनी सुसज्ज आहे. मनोरंजनाच्या विविध सोयी – सुविधा जहाजावर उपलब्ध आहेत. जहाजावरील वेलनेस सेंटरमध्ये जिम, ट्रीटमेंट खोल्या, सोना आणि स्टीमसाठीच्या खोल्यांचाही समावेश आहे. आउटडोअर जॉगिंग ट्रॅक, ४ जॅकुझी आणि २ स्विमींग टँक आहेत. भव्य असे शॉपींग सेंटरही जहाजावर आहे. वाचकांसाठी उत्तम व वैविध्यपूर्ण पुस्तकांचा समावेश असलेले सुसज्ज ग्रंथालय आहे.

Previous article. तर सत्तेला लाथ मारेन आणि जनतेसोबत येईन
Next articleनांदता येत  नसेल तर वेगळे व्हा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here