नांदता येत  नसेल तर वेगळे व्हा!

नांदता येत  नसेल तर वेगळे व्हा!

शरद पवार यांची शिवसेनेवर टीका

कराड दि.२५  भाजप सरकार फसवे असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे सांगतात हाच मोठा विनोद आहे.मग शिवसेना अशा फसव्या लोकांबरोबर राहते कशाला.जर एकत्र नांदता येत नसेल तर वेगळे व्हा.’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेवर केली आहे.

भाजप सरकार फसवे असल्याची टीका शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी समाचार घेतला. ते आज कराड येथे बोलत होते.
भाजप सरकार फसवे असल्याचे उध्दव ठाकरे सांगतात हाच मोठा विनोद आहे. मग तुम्ही फसव्या लोकांबरोबर राहता कशाला असा सवाल उपस्थित करत ‘एकत्र नांदायचे नसेल तर वेगळे व्हा’ अशा शब्दात पवार यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.पवार यांनी भाजपवरही निशाणा साधला. ‘गुजरातमध्ये भाजपाबद्दल प्रचंड नाराजी आहे. पण या निवडणुकीत गुजरातमध्ये सत्ता आणि पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल.’ असेही पवारांनी सांगितले.

Previous articleमुंबई टू गोवा’ जलप्रवास २५ डिसेंबर पासून सुरू होणार!
Next articleहिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here