जुनं ते सोनं म्हणण्याची वेळ जनतेवर आलीय

जुनं ते सोनं म्हणण्याची वेळ जनतेवर आलीय

जयंत पाटील

कराड दि. २५  आपले जुने सरकार होते तेच बरे होते, किमान आपले ऐकत तरी होते आम्ही सांगत होतो, ते त्याला कळत तरी होते. परंतु या नव्या सरकारला आमच्या समस्या,आमच्या गरजा, आमच्या अपेक्षाच कळत नाहीत अशी महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांची भावना निर्माण झाल्याची टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी कराड येथील हल्लाबोल आंदोलनातील जाहीर सभेत केली.

कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारच्या विरोधातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारच्या कारभारावर निशाणा साधला. त्यांनी आपल्या भाषणामध्ये मी गेली २५ ते ३० वर्ष यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट देतोय. परंतु २५ ते ३० वर्ष आणि मागील तीन वर्षात मला कमळ या शहरामध्ये फुललेले दिसले नाही अशी खोचक टिप्पणी केली. महाराष्ट्रातील शेतकरी सरकारच्या विरोधात चाललेला आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार स्वीकारलेली माणसे आपल्या सरकारचा विचार स्वीकारायला तयार नाहीत. बहुजन समाजाची सत्ता पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी मावळे याच भागात जास्त आहेत. आणि म्हणून चव्हाणसाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्याशिवाय पर्याय या सरकारसमोर राहिलेला नाही. कारण सरकारची सध्याची परिस्थिती पाहिली तर सळो की पळो करुन सोडणारी आहे .

महाराष्ट्रात जनतेच्या मनाप्रमाणे सत्तेवर येण्याचा प्रयत्न करणारे सरकार २०१४ ला आपण बघितलं आहे आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या मनातून उतरलेले सरकार फक्त तीन वर्षात आपण बघत असल्याची टिकाही जयंत पाटील यांनी केली. सगळं काही ऑनलाईन देणारं सरकार प्रत्यक्षात भेटायलाच तयार नाही अशी सामान्य माणसाची धारणा महाराष्ट्रात सर्वदुर झालेली आहे.आणि म्हणूनच गेल्या साडेतीन वर्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या दरामुळे घसरलेली ग्रामीण भागातील आर्थिक दुरावस्था या सगळ्या गोष्टी बघितल्या तर महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने आवाज उठवण्याची आवश्यकता होती आणि तो आवाज जनतेच्या मदतीने उठवत असल्याचे पाटील यांनी सांगितले…

 

Previous articleमुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात काॅग्रेसचा रास्ता रोको
Next articleशिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकॉलमध्ये अडकलेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here