शिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकॉलमध्ये अडकलेत

शिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकॉलमध्ये अडकलेत

शरद पवार यांची शिवसेनेवर टीका

कराड दि.२५ मी गेली पन्नास वर्षे सार्वजनिक व राजकीय जीवनात सक्रिय आहे पण सत्तेत राहायचै आणि मित्रपक्षाच्या विरोधातच आंदोलने करून टीका करायची, असे मी यापूर्वी कधीही पाहिलेले नव्हत. शिवसेनेला सत्तेचा मोह सोडवत नाही, असे मी यापूर्वीही बोललो होतो. असे स्पष्ट करत शिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकॉलमध्ये अडकलेत,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

पवार म्हणाले की, ‘शेतक-यांच्या कर्जमाफीवर सरकारने आडमुठी भूमिका घेतली तर आम्ही सत्तेवर लाथ मारू, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले होते; पण काय करणार ते आमच्या मित्राचे चिरंजीव आहेत. त्यामुळे जास्त काय बोलणार असा सवाल पवार यांनी करून, शेतक-यांच्या कर्जमाफीला छत्रपती शिवरायांचे नाव देत शेतक-यांचाच नव्हे तर शिवरायांचाही यांनी अवमान केला आहे. सत्तेत येतानाही भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव वापरले होते. मात्र, शिवरायांचे स्वराज्य कुठे आणि यांचे सरकार कुठे, हे जनतेला कळू लागले आहे असा टोलाही पवार यांनी लगावला.

Previous articleजुनं ते सोनं म्हणण्याची वेळ जनतेवर आलीय
Next articleमुख्यमंत्र्यांच्या माफीमुळे नाभिक समाजाचे आंदोलन स्थगित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here