प्रसाद लाड यांना भाजपची उमेदवारी

प्रसाद लाड यांना भाजपची उमेदवारी

माधव भंडारींना पुन्हा डावलले, राणेंचा पत्ता कट

मुंबई दि.२७  विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपने नेहमी प्रमाणे निष्ठावंतांना डावलून आयात केलेल्यांना उमेदवारी देण्याची परंपरा सुरूच ठेवली असून, राष्ट्रवादीतून भाजपात आलेले प्रसाद लाड यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. तर; काॅग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रवादीतून भाजपात आलेले प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली आहे. लाड आज ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर; काँग्रेसकडून सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.येत्या ७ डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. हि पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत.

काँग्रेसला पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल रविवारी रात्री उशिरा ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून तब्बल दोन तास चर्चा केल्याचे समजते. या भेटीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत प्रसाद लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. भाजपने या पोटनिवडणूकीच्या निमित्ताने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.अनेकदा डावलूनही पक्षावर निष्ठा असणा-या माधव भंडारी यांना पक्षाने पुन्हा एकदा डावलून आयात केलेल्यांनाच पक्षात मानाचे पान मिळते हे दाखवून देत, अडचणीचे ठरलेले नारायण राणे यांचा पत्ता कट करण्यात भाजपला यश मिळाल्याची चर्चा आहे.

Previous articleशरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी
Next articleशिवसेनेच्या पाठिंब्यामुळे प्रसाद लाड यांच्या विजयाचा मार्ग मोकळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here